शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६
शेतकर्याचे कर्ज माफ करा - निलेश मोहीते
जिरेवाडी- मागील तीन वर्षापासुन दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी यंदा पाऊस चांगला झाल्याने पिकातुन चांगले उत्पन्न होईल याआशेमध्ये होता परंतू सतत पडणा-या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकर्याचे नुकसान झाले आहे व काही भागातील कापणीस आलेले मुग, उडीद, ज्वारी, सोयाबीन, कापुस आदी पिकांचे आतोनात नुकसान झाले असुन या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. हातचे पिक वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्चे कर्ज माफ करावे अशी मागणी माळापुरी जि,प गटाचे युवा नेते निलेश मोहीते यानी केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा