राष्ट्रीयीकृत बँकांच्या कारभारावर नाराजी :
निलेश चाळक मो,९७६७८९४६१९ बीड : नोटाबंदीचा निर्णय होऊन ३१ दिवसांचा कालावधी उलटला असून बीड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांसह विविध बँकांमध्ये अजूनही ग्राहकांची गर्दी ओसरलेली नाही. या गर्दीत शेतकरी, कर्मचारी, व्यापारी व सर्वसामान्य खातेदार यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाच्या मशागत कामासाठी तसेच बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची निकड भासत आहे. त्यामुळे ते बँकांकडे येत आहेत. मात्र बँकांकडे नोटांची टंचाई असल्याने व रिझर्व बँकेकडून बीड जिल्ह्याला पुरेसे चलन उपलब्ध करून देण्यात न आल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना समाधानकारक रक्कम आपल्या खात्यातून मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या कारभाराप्रती कमालीची नाराजी पसरली आहे.तर रक्कमे अभावी अनेक एटीयम बंद आहेत काही ठिकाणी सुरू आहेत त्याठिकाणी एटीएमच्या बाहेर गर्दीच आहे
एटीएम समोर गर्दीच गर्दी , तर रक्कमे अभावी अनेक एटीयम बंद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा